भौगोलिक क्षेत्रफळ (हे. आर.)
लोकसंख्या
वॉर्ड संख्या
मतदार संख्या
कुटुंब संख्या
शाळा/महाविद्यालय संख्या
अंगणवाडी संख्या
म्हावशी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खंडाळा तहसीलमध्ये स्थित एक गाव आहे. ते उपजिल्हा मुख्यालय खंडाळा (तहसीलदार कार्यालय) पासून ५ किमी अंतरावर आणि जिल्हा मुख्यालय सातारा पासून ६५ किमी अंतरावर आहे. २००९ च्या आकडेवारीनुसार, म्हावशी गाव देखील एक ग्रामपंचायत आहे. म्हावशी चैतन्यशील सातारा प्रदेशात स्वतःचे स्थान आहे. पुढील विभागांमध्ये, तुम्हाला लोकसंख्या, साक्षरता, कुटुंबे, मुले, जातीचा डेटा, क्षेत्र, पिनकोड, स्थानिक प्रशासन, जवळपासची गावे, संपर्क, याबद्धलची माहिती मिळेल म्हावशी गावची लोकसंख्या २०११ च्या जणगनेनुसार ८२४ आहे.गाव हागणदारी मुक्त असून गावाला राष्ट्रपती माननीय डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलम यांच्या हस्ते ४ मे २००७ रोजी निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला आहे.गावामध्ये सांडपाणी व्यवस्थापनामध्ये बंदिस्त गटारे आहेत.संपूर्ण गावामध्ये कॉन्क्रेट चे रस्ते आहेत.गावामध्ये कुटुंब संख्या १८४ आहे घन कचरा व्यवस्थापनामध्ये प्रत्येक कुटुंब ओल्या कचऱ्या पासून गांडूळ खत निर्मितीसाठी ड्रम दिले आहेत व सुक्या कचऱ्या साठी डस्ट बिन दिले आहेत.उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा यासाठी ग्रामपंचायतीने संपूर्ण गावामध्ये वॉटर मीटर बसविले आहेत.गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सी.सी.टी .व्ही.कॅमेरे बसविण्यात आले आहेत.गावामध्ये सोलर सिस्टीम ११ ठिकाणी बसविण्यात आले आहेत.गावामध्ये स्वच्छ व सुंदर स्मशानभूमी आहे.गावामध्ये भारदस्त अशी व्यायाम शाळा आहे.गावामध्ये लोकांना शुद्ध पाण्यासाठी फिल्टर प्लांट विकास सोसाईटी च्या माध्यमातून बसविण्यात आले आहे.लहान मुलांना खेळण्यासाठी खेळाचे साहित्य बसविण्यात आले आहे.तसेच भव्य असे खेळाचे मैदान आहे .गावात नवीन ५०० वृक्ष लागवड करण्यात आली आहे.गावामध्ये जिल्हा परिषदेची इ ४ पर्यंत मराठी शाळा आहे.शाळेमध्ये सोलर सिस्टीम,सी.सी.टी.व्ही कॅमेरे रेन वॉटर हार्वेस्टिंग बसविण्यात आले आहेत,तसेच मुला-मुलीना स्वतंत्र टोय लेट ची व्यवस्ता आहे.तसेच बोलक्या भीती आहेत.कॉम्पुटर,प्रोजेक्टर इ सोयींनीयुक्त अशी आदर्श शाळा आहे.शाळेला आदर्श शाळा पुरस्कार मिळाला आहे.तसेच गावामध्ये २ अंगणवाड्या आहेत ,अंगणवाड्यामध्ये सोलर सिस्टीम रेन वॉटर हार्वेस्टिंग,टी.व्ही ,रंगरंगोटी ,बोलक्याभिंती,गार्डन ,खेळणी,सुरेख मैदान इ सोई उपलब्ध करून दिल्या आहेत.गावामध्ये सुसज्य अशी ग्रामपंचायत आहे.ग्रामपंचायत मध्ये आपले सरकार अंतर्गत सर्व सोई सुविधा उपलब्ध केल्या जातात. भारतात विविध प्रकारच्या शैलीचे मंदिर पाहावयास मिळतात. महाराष्ट्रात तर मंदिरांचा खजिनाच आहे. विविध शैलीची मंदिर आपण दगडा पासुन ते संगमरवरी दगडा पर्यंत पाहीली असतील पण फक्त माती वापरुन माती पासुन बनवलेले मध्ययुगीन काळात बनलेले मातीचे अदभुत मंदिर "म्हावशी" गावात पाहावयास मिळते. स्थानिक लोंकाशिवाय कुणालाही माहित नसलेले हे मंदिर खंडाळा पारगाव ( खंबाटकी घाट ) जवळ आहे. म्हावशी ता. खंडाळा (सातारा) येथील मातीची मंदिरे ही मध्ययुगीन बांधकामाचा एक अनोखा नमुना आहेत, जिथे पांढऱ्या मातीच्या उन्हात वाळवलेल्या विटांचा वापर करून देव्हारा, मंडप आणि खोल्यांची रचना केली गेली आहे; या मंदिरांवर पावसाने माती जमा झाल्याने ती जमिनीखाली गाडल्यासारखी दिसतात आणि शांत वातावरणासाठी ओळखली जातात. ही मंदिरे म्हणजे त्या काळातील स्थानिक स्थापत्यशैलीचे आणि साहित्याचे उदाहरण आहेत. जमीनीखाली असलेल्या या मंदिराला भुयारी मार्ग असुन भुयाराची उंची ५ ते ६ फुट असुन वरचे शिखर शंख सदृश असुन उंची ६ फुटाच्या वर आहे. शिखर मातीचे असुन आत मध्ये कमानी दरवाजे आहेत. जवळ जवळ १० ते १२ शिखर असून आजमितीला ४ते५ शिखर तग धरुन आहेत. या शिखरांच्या खाली कोठार ( पेव) सदृश जागा असुन त्या खोल्या एकमेकांना कमानी दरवाजांनी जोडल्या आहेत. हवा खेळती रहावी म्हणुन शिखरांना झरोके दिली आहेत. याच एका शिखराच्या तळघरांत हिंगळाई मातेची अष्टभूजा , आयुधंधारी मूर्ती असुन आत मध्ये जाण्यासाठी मातीचेच भुयार असुन लांबी २० ते २५ फुट आहे. देवीच्या बाजुला मातीतच कोरलेले खांब असुन तेथेच छोटासा गाभारा आहे. जिथे थोड्यापार विटा वापरल्या आहेत त्या सुध्दा या मातीच्या कच्चा विटा आहेत. कधीकाळी गावची पांढरी असलेल्या या छोट्या टेकाडावर अदभुत अस पांढ-या मातीत बांधलेल व बारा शंखाच्या आकाराचे शिखर असलेले हे मंदिर काळाच्या आोघात वादळ ,वारा ऊन ,पाउस खात ह्या मातीच्या मंदिरची पडझड झाली आहे. गतवर्षी पर्यंत फक्त पाच शिखर बाकी होते. पण पावसामुळे माती वाहून गेल्याने हा ऐतिहासिक वारसा नष्ट झाला आहे.